Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदोन वेळच्या अन्नाला मोताद, भूक भागवण्यासाठी मंदिरातील नैवेद्याच्या नारळांकडे सूरजची आशाळभूत नजर;...

दोन वेळच्या अन्नाला मोताद, भूक भागवण्यासाठी मंदिरातील नैवेद्याच्या नारळांकडे सूरजची आशाळभूत नजर; आव्हाडांची भावूक पोस्ट

आपल्या झपुक झुपूक स्टाईलनेच नाही तर मस्ती आणि आपुलकीने वागण्याच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकणारा बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाणला कौतुकाची थाप मिळत आहे. सोशल मीडियावर सर्व स्तरांमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वचजण सुरजच्या कष्टातून वर येत मनोरंजन सृष्टीतील बिग बॉस सारख्या शोमध्ये विजयी होण्यावरून कौतुक व अप्रूपाने पहात आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरज ला पाठिंबा देण्यासाठी ट्विटर पोस्ट केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही बिग बॉस विजेता सुरजचं कौतुक केलंय. जिंकलास भावा तुझं करावं तितका कौतुक कमीच आहे असं म्हणत आव्हाडांनी सुरज विषयी भावूक पोस्ट केली आहे.

 

नैवेद्याचे नारळ उचलून आपली भूक भागवायचा

आव्हाडांनी बिग बॉस विजेत्या सुरजच्या कौतुकाची एक पोस्ट एक्स माध्यमावर प्रसिद्ध केली आहे . यात कष्टातून वर आलेल्या सुरजचं कौतुक करताना त्यांनी लिहिलं, आपल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावचा आई मरी मातेच्या मंदिरा बाहेर उभा राहून दिवसातून तीन वेळा डोकावून पाहायचा हा पोरगा… की नीवद( नैवेद्य) नारळ आलेत का माझ्या पुढं ..ते आलेले दिसले की तो ते उचलून खायचा . आपली भूक भागवायचा.

आव्हाडांनी केलेल्या भावूक पोस्टवर नेटकऱ्यांनीही सुरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका गरीब घरातला मुलगा सूरज एवढ्या सगळ्या सेलेब्रिटीज़ मध्ये त्या सेलिब्रिटी पेक्षा जास्त फेमस आहे. सूरज चव्हाण ह्याचे मनापासुन अभिनंदन असं म्हणत नेटकऱ्यांनीही सुरजचं कौतूक केलंय, गरीब घरातील साधा भोळा बहुजन समजतील सामान्य मुलगा

याने भल्या भल्या दिग्गज कलाकारांना मागे टाकून Bigboss ची ट्रॉफी जिंकली…. खरतर जनतेनं या सामान्य मुलाला डोक्यावर घेतलं म्हणुच शक्य झाले…. जनता मायबाप काहीही करू शकतात. अशीही एक प्रतिक्रीया सुरजच्या चाहत्यानं दिली आहे.

आव्हाडांन एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय, सुप्रसिद्ध रील स्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला . अखेर त्याने मनाची ट्रॉफी आपल्या पदरात पाडून घेतली .बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच देशभर सुरज ची क्रेझ वाढली होती . आणि आता अधिकच वाढली आहे . बिग बॉस सारख्या अवघड रियालिटी शो मध्ये 274 लोकांमधून अंतिम सोहळा मध्ये त्याची निवड होत अखेर विजयी होणंही अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे . जिंकलास भावा .. तुझं करावं तितकं कौतुक कमीच आहे . असं आव्हाडांनी म्हटलंय .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -