Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा फोन; मिळेल 128GB स्टोरेज...

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा फोन; मिळेल 128GB स्टोरेज आणि 5000 mAh बॅटरी

अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे आता त्यात मोबाईलची देखील भर पडलेली आहे. कोणताही माणूस हा मोबाईल शिवाय राहत नाही. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र निवाऱ्याची माणसाला गरज असते. त्याचप्रमाणे मोबाईलची देखील गरज असते. बाजारात देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मोबाईल उपलब्ध झालेले आहेत. आणि सध्या भारतामध्ये सणासुदीचे दिवस चालू झालेले आहे. तोंडावर दसरा आणि दिवाळी आलेले आहेत.

त्यामुळे अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी सेल चालू केलेले आहेत. असेच आता फ्लिपकार्टवर एक मोठा वार्षिक सेल चालू झालेला आहे या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोनवर चांगल्या प्रकारे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. जर दहा हजार रुपयांपर्यंत तुमचे बजेट असेल आणि तुम्हाला एक चांगला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण अशाच एका मोबाईल फोनबद्दल जाणून घेणार आहोत.

 

फोनची किंमत 9,249 रुपये

हा फोन POCO M6 5G आहे, जो किफायतशीर किमतीत चांगल्या फीचर्ससह येतो. त्याचा 4GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,249 रुपयांना विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक आणि नो-कॉस्ट-ईएमआयची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर फ्लिपकार्ट या डीलमध्ये एक्सचेंज ऑफरही देत आहे. सर्व ऑफर एकत्र केल्यास, प्रभावी किंमत खूपच कमी होते.

 

डिस्प्ले आणि प्रोसेसर

फोनमध्ये 6.74 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण मिळाले आहे. फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट देण्यात आला आहे.

 

बॅटरी आणि कॅमेरा

यात 18W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी आहे. मागील पॅनलवर 50MP प्राथमिक सेन्सर आणि सेल्फीसाठी 5MP सेंसर देण्यात आला आहे. ओरियन ब्लू आणि गॅलेक्टिक ब्लॅक रंगांमध्ये फोन खरेदी करता येईल. यात Android 13 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी अपग्रेड करण्यायोग्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -