10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा चौथा हफ्ता दिला जाणार आहे, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही ॲडवान्समध्ये (November Month Installment In Advance) जमा केला जणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे (Fourth Installment Big Update).
लाडक्या बहिणींना पडलाय प्रश्न
राज्यात जवळपास 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. या योजनेतील अनेक पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेचा चौथा हफ्ता कोणत्या तारखेला मिळणार? असा प्रश्न महिलांना पडला होता.
या तारखेपासून खात्यात येणार चौथ्या हफ्त्याची रक्कम
10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल, असे लाडके दादा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी 8 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात चौथ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांची एकत्रित रक्कम जमा होईल.
महिलांच्या खात्यात किती रुपये होणार जमा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे जुलै आणि महिन्याचे अर्ज मंजूर झाले होते, पण त्यांच्या खात्यात अजूनही योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे एकूण 7500 रुपये जमा केले जाणार असल्याचे समोर आले आहे. ज्या महिलांना सप्टेंबरच्या हफ्त्याची रक्कम मिळाली होती. त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.खुशखबर! बहिणींनाही दिवाळीचा बोनस, ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 7500 रुपये