उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
सोलापुरातील सर्व उपसा सिंचन योजना, सौर ऊर्जेवर करण्याची सुरुवात येथून करतोय. उपसा सिंचनचे जे बिलं यायचे ते आता येणार नाही.
आम्ही लखपती दीदीचा कार्यक्रम केला. मोदींच्या योजनेतून ज्यांनी व्यवसाय सुरु करून वर्षात एक लाख रुपये कमवले. जळगावमध्ये अशा 11 लाख लखपती बहिणी एकत्रित आल्या. तेव्हा आम्ही ठरवलं की, आता पहिल्या टप्यात 25 लाख लखपती दीदी करू आणि आणू. पुढे एकूण एक कोटी महिलांना लखपती करू.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांनी संगितलं आज येऊ शकलो नाही, पण पुन्हा येईन, असं त्यांनी सांगितलं आहे. तुमचा आशीर्वाद घेऊन जाऊन थेट मुख्यमंत्र्यांना देईन.
मुलींच्या उच्च शिक्षणाची फी शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पैशांची अडचण असेल तर आधी मुलीचं शिक्षण बंद करतात आणि मुलांचे शिक्षण करतात.
तिला म्हणतात घरी बस, पण आम्ही सांगतोय तुमचे मामा मंत्रालयात बसले आहेत. आम्ही तुमची फी कितीही असली, तरी या मुलींची फी भरणार आहे.
मी मुलीचा बाप आहे, मुलगी शिकली की जास्त काळजी घेते, म्हातारा झालं तरी सांभाळते. एसटीमध्ये तिकीट अर्धे केले. एसटी डबघाईला येईल, असं म्हणाले.
पण नंतर एसटीवाले म्हणाले ही योजना बंद करू नका, एसटी यामुळे फायद्यात आली आहे.
मी माहिती घेतली तर समजलं की, आता महिलाच तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी चालले आहेत. भाऊजींना म्हणतात तुम्ही गेलं की तिकीट दुप्पट लागतात, त्यात तुम्ही खर्रा काय काय खाता, व्यसन करता. त्यामुळेच जास्त खर्च होतं. त्यामुळेच भाऊजींना घरी बसवून महिलाच बाहेर जाताहेत.