Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रटाटा ग्रुपमध्ये रतन टाटांची प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून सुरुवात… मेहनत अन् सचोटीने बनले...

टाटा ग्रुपमध्ये रतन टाटांची प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून सुरुवात… मेहनत अन् सचोटीने बनले साम्राज्याचे चेअरमन

देशातील दिग्गज व्यावसायिक अन् टाटा ग्रुपचे चेअमरन रतन टाटा असेच मोठे झाली नाही. टाटांच्या घरात जन्म झाला तरी त्यांनी स्वत:ला सिद्ध करावे लागले. त्यासाठी कंपनीत साधारण कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. कंपनीतील कामगार ते टाटा समुहाचे चेअरमन बनण्याची त्यांची यशोगाथा केवळ मेहनत अन् सचोटीची आहे.

 

जेआरडी यांनी मुंबईत बोलवून घेतले…

1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टीलमध्ये कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी सहा वर्षे काम केले. कामाची सुरुवात त्यांनी निळ्या रंगाचे ओव्हरॉल्स परिधान करून शॉपफ्लोर वर्कर म्हणजे कामगार म्हणून केली. त्यानंतर त्यांना प्रोजेक्ट मॅनेजर बनवण्यात आले. काही काळाने ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस.के. नानावटी यांचा विशेष सहाय्यक बनले. त्याच्या मेहनतीची चर्चा जेआरडी टाटा यांच्यापर्यंत गेली. मग जेआरडी टाटांनी त्यांना मुंबईला बोलावले. त्यांना ऑस्ट्रेलियात वर्षभरासाठी पाठवले.

 

या अडचणीत आलेल्या कंपन्यांची दिली जबाबदारी

जेआरडी टाटा यांनी त्यांना अडचणीत आलेली कंपनी सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्कोमध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी दिली. त्यांच्या नेतृत्वात तीन वर्षांत नेल्कोचे कायपालट झाले. कंपनी नफ्यात आली. त्यानंतर 1981 मध्ये जेआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना टाटा इंडस्ट्रीजची कमान दिली. या कंपनीचे टर्नओव्हर फक्त 60 लाख होते. परंतु तिचे महत्व होते. कारण स्वत: जेआरडी ही कंपनी पाहत होते.

 

चेअमनपदाच्या शर्यतीत नव्हतेच अन्…

जेव्हा जेआरडी 75 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी उत्तराधिकारीची निवड करण्याचा निर्णय घेतला. मग नानी पालखीवाला, रूसी मोदी, शाहरुख साबवाला आणि एचएन सेठना यांच्यातील कोणातरी उत्तराधिकारी बनवणार, असे रतन टाटा यांना वाटत होते. परंतु रतन टाटा यांची निवड झाली. 25 मार्च 1991 रतन टाटा समुहाचे चेअरमन बनले.

 

भारतात जेव्हा कोविड महामारी पसरली तेव्हा रतन टाटा यांनी तात्काळ टाटा ट्रस्टकडून 500 कोटी रुपये आणि टाटा कंपन्यांच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये दिले. महामारी आणि लॉकडाऊनच्या आर्थिक परिणामांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी हा निधी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -