खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. खरा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर संध्याकाळी होत आहे. तर डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील असा घणाघात त्यांनी घातला. आज राजकीय दसरा मेळाव्याची लाट आल्याचे ते म्हणाले. आज राज्यात अनेक दसरा मेळावे होत आहे. सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. तर मराठवाड्यात दोन मेळावे होत आहे.
शिवतीर्थावर खरा दसरा मेळावा
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली. दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी दिलं. दसऱ्याच्या मुहूर्तावर देशाला महाराष्ट्र विचाराचं सोनं देत राहिला. ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी जपली आहे. तुम्ही भले पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव चोरला असेल पण जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे. ते निवडणूक आयोग ठरू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
विधानसभेत मोठे यश
शिवसेना कोणाची हे निवडणुकीनंतर समोर येईल. मोदी-शाह यांच्या मेहरबाणीवर जगणारे की या मातीसाठी लढणारे यापैकी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा या राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईतला आजचा दसरा मेळावा जो आहे हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक आहे. आज विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येईल. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. आता विधानसभेत सुद्धा मोठे यश मिळेल असे ते म्हणाले.
कात्रजच्या घाटात मशाल
राज्यातील सत्तेवर बसलेल्या या रावणांना आता पुन्हा सत्तेत बसू देणार नाही हे जनतेने निश्चित केल्याचे आणि अशा प्रवृत्ती पुन्हा येणार नाहीत. या दसरा मेळाव्यात पिपाण्या चालणार नाहीत, असा खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ या देशामध्ये एकच मेळावा होतोय जिथे विचारांचा सोनं लुटल जात आहे तो म्हणजे शिवतीर्थावरील सेनेचा दसरा मेळावा आहे. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मेळावा होत आहे. कात्रजच्या घाटात मशाल उपयोगी आली, हुतात्म्यांच्या स्मारकात देखील त्यांच्या हातात मशाल दिसते आणि तीच मशाल जळणार आहे, असे ते म्हणाले.