Wednesday, October 16, 2024
Homeक्रीडा1..2..3..4..! बापरे बाप एक सामन्यात इतके सारे विक्रम, टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये...

1..2..3..4..! बापरे बाप एक सामन्यात इतके सारे विक्रम, टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये काय केलं वाचा

भारताने टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली आहे. प्रतिष्ठित संघाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध 6 गडी गमवून 297 धावा केल्या. या यादीत नेपाळ संघ आघाडीवर असून त्यांनी मंगोलियाविरुद्द 20 षटकात 3 गडी गमवून 314 धावा केल्या आहेत.

 

भारताने सर्वात कमी चेंडूत 100 ही धावसंख्या गाठली आहे. भारतीय संघाने 100 धावा करण्यासाठी फक्त 43 चेंडू घेतले. म्हणजेच 7.1 षटकात 100 धावा पूर्ण केल्या.

 

भारताने सर्वात कमी चेंडूत 200 धावा करण्याचा विक्रमही बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केला. भारताने फक्त 84 चेंडूत भारताने 200 धावांचा पल्ला गाठला. म्हणजेच 14 षटकात 200 धावा पूर्ण केल्या.

 

भारताने पहिल्या 10 षटकात सर्वोत्तम धावसंख्येची नोंद केली आहे. 10 षटकात एक गडी गमवून 152 धावा केल्या. तर टी20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये 1 गडी गमवून 82 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.

 

भारताने एका इनिंगमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम चेक रिपब्लिक या संघाच्या नावावर होता. त्यांनी एका डावात 43 चौकार मारले होते. भारताने एक पाऊल पुढे जात 47 चौकार मारले आहेत.

 

भारताने एका डावात पहिल्यांदाच सर्वाधिक षटकार मारले आहेत. भारताने बांगलादेशविरुद्ध 22 षटकार मारले आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याच विक्रम नेपाळच्या नावावर आहे. मंगोलियाविरुद्ध एका डावात 26 षटकार मारले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -