Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रटाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या रतन टाटा यांचा पगार किती होता?...

टाटा उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या रतन टाटा यांचा पगार किती होता? एका मिनिटाला मिळायचे तब्बल ‘इतके’ रुपये?

टाटा उद्योग समूहाला (Tata Industries Group) यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Died) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 10 ऑक्टोबर रोजी निधन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण उद्योगविश्वासह भारतभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक भावूक, आठवणीत राहावेत असे प्रसंग समोर येत आहेत. दरम्यान, कधीकाळी संपूर्ण टाटा उद्योगाची धुरा सांभाळणाऱ्या रतन टाटा यांना नेमका पगार किती मिळायचा याची अनेकांना उत्सुकता आहे.

 

टाटा उद्योग समूहाचा 100 देशांत विस्तार

टाटा उद्योग समूह फक्त भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांत पसरलेला आहे. या उद्योग समूहाच्या 30 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. जवळपास 100 देशांत टाटा उद्योग समहूाचा उद्योग विस्तारलेला आहे. रतन टाटा यांनी 1991 ते 2012 या काळा टाटा समूह आणि टाटा सन्स या अद्योग समूहाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. या काळात त्यांनी टाटा उद्योग समूहाला नव्या शिखरावर नेऊन ठेवला. रतन टाटा हे ऑक्टोबर 2016 ते जानेवारी 2017 या काळात टाटा उद्योग समूहाचा अंतरिम अध्यक्ष होते.

 

रतन टाटा यांचे वेतन किती होते?

वेगवेगळ्या वृत्तांनुसार टाटा उद्योग समूह आणि टाटा सन्सचे अध्यक्ष असताना रतन टाटा यांचा वार्षिक पगार 2.2 कोटी रुपये होता. या वार्षिक गारानुसार रतन टाटा यांना महिन्याला साधारण 20.83 लाख रुपये पगार मिळायचा. म्हणजेच रतन टाटा यांना दिवसासाठी 70 हजार रुपये पगार मिळायचा. एका तासाचा हिशोब करायचा झाल्यास त्यांना एका तासाला 2900 रुपये मिळायचे.

 

रतन टाटा यांची संपत्ती किती होती?

इतर उद्योगपतींच्या तुलनेत रतन टाटा यांना फारच कमी वेतन मिळालयचे. रतन टाटा यांना समाजोपयोगी कामे करण्याची फार आवड होती. शिक्षण, वैद्यकीय सेवा, संशोधन आदी क्षेत्रात त्यांनी भरभरून आर्थिक मदत केलेली आहे. रतन टाटा हे अब्जाधीश होते. त्यांना पगाराव्यतिरिक्त गुंतवणूक केलेले शेअर्स, अन्य गुंतवणुकीतूनही पैसे मिळायचे. रतन टाटा यांची एकूण संपत्ती 3800 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -