सरकारने आज दसऱ्याच्या दिवशी होमगार्ड न मोठी खुशखबर दिली आहे. या खुशखबरी सरकारने होमगार्डचे मानधन अगदी दुपटीने वाढवणलयाचे म्हटले आहे. आणि ही केवळ घोषणा नाही तर याचा निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळणार आहे.
नव्या निर्णयानुसार होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस 570 रुपयांवरून थेट 1 हजार 83 रुपये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात आहे.
दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे होमगार्ड मित्रांनो मधून मोठे कौतुक होत आहे आणि शासनाचे आभार देखील मानण्यात येत आहेत.