Wednesday, October 16, 2024
Homeराजकीय घडामोडीशेतकऱ्यांना 365 दिवस मोफत वीज कशी देणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला प्लान

शेतकऱ्यांना 365 दिवस मोफत वीज कशी देणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला प्लान

“निवडणुकीचा शंखनाद झाला. आमच्यासाठी शंखनाद. काहींसाठी ऐलान झालाय. या निमित्ताने महायुती सरकारने दोन सव्वा दोन वर्षात जे कार्य केलं त्याचं रिपोर्ट कार्ड ठेवत आहोत. अर्थात हे संक्षिप्त आहे. सविस्तर त्यातील प्रत्येक मुद्दा त्या त्या घटकांसाठी केलेली कामे याची पुस्तिका आहे. ती तुमच्यापर्यंत पोहोचवू” असं भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते महायुतीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

“राज्यातील जनतेच्या लक्षात आलं असेल, स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार आलं आहे. ज्या वेगाने शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने परिवर्तन करणाऱ्या योजना आणल्या. त्या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती सांगणाऱ्या आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

“महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. शेती वीजेसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. 14 हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं. येत्या 15 ते 18 महिन्यात पूर्ण काम होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज देऊ. ही घोषणा नाही. प्रत्यक्ष काम सुरू केलं आहे. आता साडे आठ रुपयाची वीज 3 रुपयाला पडणार आहे.

10 हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत. त्याआधारे शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना आहे. प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे. विजेच्या बाबतीत शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्याचं काम आपण केलंय. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

‘सर्व गोष्टींचं टेंडर निघालं’

 

“सिंचनाच्या क्षेत्रातही या सरकारने अभूतपूर्व काम केलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली नाही. 145 प्रकल्पांना ही मान्यता दिली आहे. दुष्काळी भागात ही प्रकल्प मान्य केले आहेत. अनेक दुष्काळी भागातील कामे सुरूवात झाली आहे.

सर्वात महत्त्वाचं नदी जोड प्रकल्प 90 हजार कोटीचा नारपार प्रकल्प केला. पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी वाचवलं. मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करण्यासाठी कार्यवाही केली आहे. कोणतीही योजना कागदावर नाही. सर्व गोष्टींचं टेंडर निघालं. अनुसंधान सुरू आहे. सिंचन क्षेत्रात मोठं काम सुरू आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -