Tuesday, December 2, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने त्याग केल्याच्या शाहंच्या कथित वक्तव्यावर फडणवीस, शिंदे म्हणाले…

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने त्याग केल्याच्या शाहंच्या कथित वक्तव्यावर फडणवीस, शिंदे म्हणाले…

एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन. “महायुतीने मराठा समाजाला काय दिलं, याचा जरांगेनी विचार करावा. मराठा समाजाला देणारं कोण? आणि फसवणारं कोण? याचा विचार करावा” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

“ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजला आरक्षण दिलं. आम्ही मराठा आरक्षण टिकवलं. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. मराठा समाजाचा वापर फक्त सत्तेसाठी केला गेला” असं एकनाथ शिंदे म्हणाले

 

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा नेत्यांनी त्याग केल्याची आठवण अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली, जागा वाटपात याचा विचार व्हावा असं शाह म्हणाले, अशी चर्चा आहे.

 

त्यावर “आमच्या माणसांना त्याग करावा लागला असं शाह बोलले नाहीत. असं कुणी कुठं बोललं नाही, बैठकीत आम्ही असतो” असं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

महायुतीच्या या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरुन शरद पवारांना आव्हान दिलं. “शरद पवारांना आव्हान करतो की, त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगावा” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -