Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रबिग बॉस फेम अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला; VIDEO शेअर करत...

बिग बॉस फेम अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला; VIDEO शेअर करत सांगितला घडला प्रकार

बिग बॉस ओटीटी सीझन 3 फेम युट्युबर अरमान मलिक याचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अरमान मलिकचा भीषण कार अपघात झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. भीषण अपघातातून अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका यांच्यासह ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. अरमान मलिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत अपडेट शेअर केली आहे. युट्युबरअरमान मलिकने दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये एन्ट्री घेतली, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

 

प्रसिद्ध युट्यूबरचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला

आता अरमान मलिकचा भीषण अपघात झाला आहे, ज्यामुळे तो मृत्यूच्या जबड्यातून बचावला असल्याचं त्याने सांगितलं आहे. अरमान मलिकने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, तो मनालीला एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. तेथून परतत असताना त्यांच्या नवीन गाडीचा टायर फुटला. या भीषण अपघातात त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता, मात्र ते थोडक्यात बचावले. अरमान मलिकचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

नेमकं काय घडलं?

यूट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरमान सांगतोय की, “एक आठवड्यापूर्वी मी या कारची तक्रार केली होती. आज आमच्यासोबत दुर्घटना घडली. आज आम्ही शूटिंग करून मनालीहून परत येत होतो, तेव्हा गाडीचा पूर्ण टायर फुटला. आम्ही मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावलो आहोत. मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागच्या सीटवर बसली होती”. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आम्ही मरता-मरचा वाचलो आहोत.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -