Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भ-मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

विदर्भ-मराठवाड्यात आज मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मागील आठवडाभरापासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या सरी तर काही भागात उन्हाचा कडाका जाणवतो आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात चांगलाच उकाडा वाढला आहे.

अशातच हवामान खात्याने आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होणार असून काही भागात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

 

आज शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्या देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.

 

दरम्यान, सध्या काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. शुक्रवारी (ता. १८) ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला, चंद्रपूर, अमरावती येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील आठवडाभर राज्यात हवामानाची अशीच स्थिती राहिल, असं सांगण्यात

आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -