Wednesday, February 5, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत एकावर चाकूहल्ला ; दोघे जखमी

इचलकरंजीत एकावर चाकूहल्ला ; दोघे जखमी

इचलकरंजीत नुकताच किरकोळ कारणावरून मारहाण झाली. यामध्ये झालेल्या वादातून विट आणि चाकूने केलेल्या मारहाणीत दोघे भाऊ जखमी झाले. शिवम रमेश गिरी (वय २१) व रोहित सुरेश गिरी (दोघे रा. कृष्णानगर, शहापूर) अशी जखमींची नांवे आहेत. या प्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात सोहेल नदाफ व अन्य ८ अशा ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम गिरी याने फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवम गिरी याचा भाऊ रोहित गिरी हा व्यायामशाळेतून घरी परतत असताना सोहेल नदाफ व अन्य एकजणाने त्याला अडवत आम्हाला ओळखतोस काय अशी विचारणा केली. त्यावर नकार दर्शविल्याने नदाफ व अनोळखी व्यक्तीने रोहित यास चापट मारली.

 

हा प्रकार रोहितने शिवम यास सागितला. दोघे मिळून विक्रमनगर परिसरात बालाजी चौक येथे आले असता नदाफ व त्याच्या साथीदारांनी रोहित याला पकडले. त्याला सोडविण्यास शिवम हा पुढे आल्यानंतर एकाने शिवम याच्यात डोक्यात विट मारली तर रोहित याच्या डाव्या हातावर दुसऱ्याने चाकूने वार केला. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. नदाफ याच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -