Thursday, May 30, 2024
Homenewsहनीमूनच्या रात्री नवऱ्याचा चेहरापाहून नवरीला बसला धक्का.... थेट गाठलं पोलीस स्टेशन

हनीमूनच्या रात्री नवऱ्याचा चेहरापाहून नवरीला बसला धक्का…. थेट गाठलं पोलीस स्टेशन


लग्न हा प्रत्येक वधू-वरासाठी महत्वाचा दिवस असतो, कारण त्या दिवसापासून ते आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करतात. म्हणून लग्नाचा प्रत्येक क्षण लक्षात रहावा अशी वर आणि वधूची इच्छा असते. त्यात लग्नानंतरचे सुरूवातीचे काही दिवस नववधूसाठी परीक्षेचे दिवस असतात कारण तिला नवीन घरात, नवीन लोकांशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं. आपल्या भारतात अजूनही काही भागात नवरा नवरी एकमेकांना न पाहाता आई वडिलांनी ठरवून दिलेल्या जोडीदरासोबत लग्न करतात. परंतु यामुळे अनेक लोकांची फसवणूक देखील होते. याचे एक उदाहरण उत्तराखंडमधील सितारगंजमधून समोर आलं आहे.


येथे एका वधूने हनीमूनच्या दिवशी आपल्या पतीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. खरं तर, या मुलीचे लग्न धोक्याने तिच्या वयापेक्षा खूपच जास्त वयाच्या मुलाशी लग्न करुन दिले होते.


खरेतर लग्नाआधी या मुलीला एका मध्यमवयीन तरुणाचा फोटो दाखवण्यात आला. त्यामुळे तिने फक्त फोटो पाहून लग्नाला होकार दिला. तिने लग्नात देखील आपल्या होणाऱ्याला नवऱ्याला पाहिले नाही. पण जेव्हा हनिमुनच्या रात्री नववधूने आपल्या पतीचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्का बसला.
जेव्हा मुलीने तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहिला, तेव्हा तिच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. कारण हा तो तरुण नाही ज्याला तिने फोटोमध्ये पाहिले होते.


तिच्या समोर असलेला व्यक्ती हा तिच्या वयापेक्षा खूपच मोठा होता. जो विवाहित होता आणि त्याची पहिली पत्नी जिवंत आहे, एवढेच काय तर त्याला तिच्यापासून मुलेही आहेत. ही सगळी माहिती कळाल्यानंतर वधूने तिथून पळ काढला. त्यानंतर महिलेने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला.


मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीने आपल्या पतीचे घर सोडले आहे आणि आता ती तिच्या प्रियकरासोबत राहण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत तिच्या नवऱ्याने देखील पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे उपनिरीक्षक गंगाराम गोला यांनी सांगितले.


मुलीने पोलिसांना सांगितले की, एक वर्षापूर्वी तिचे लग्न बरेली जिल्ह्यातील सेंथल गावात राहणाऱ्या एका पौढ व्यक्तीशी झाले होते. तिने सांगितले की, लग्नापूर्वी एका वेगळ्याच तरुणाचा फोटो तिला दाखवण्यात आला होता. त्या तरुणाचा फोटो पाहून तिने लग्नाला होकार दिला होता, पण तिचे ज्या व्यक्तीशी लग्न झाले तो व्यक्ती वयाने तर मोठा आहेच, त्याचबरोबर तो तीन मुलांचा बाप देखील आहे.


लग्नानंतर जेव्हा मुलीला सत्य कळले तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिला फार मोठा धक्का बसला. त्यानंतर ती तिच्या प्रियकराच्या संपर्कात आली. आता तिला तिच्या प्रियकराशीच लग्न करायचे आहे. त्याचवेळी, या दोघांचे नातेवाईक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोघेही लग्न करून एकत्र रहाण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -