Tuesday, August 5, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहूया : माजी आ....

इचलकरंजी : पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहूया : माजी आ. सुरेश हाळवणकर 

पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे राहून त्याला निवडुन आणण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करुया, अशी सुचना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिली.

 

भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आपण विधानसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा शुक्रवारी केली होती.

 

या घोषणेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे काही प्रमुख मंडळी शनिवारी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची भेट घेतली.

 

हिंदुराव शेळके यांनी इचलकरंजी विधानसभेची निवडणुक अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकत्यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. या पाश्वभूमीवर अशोक स्वामी, अजितमामा जाधव, तानाजी पोवार, उदय बुगड, दिलीप मुथा, युवराज माळी यांच्यासह काही प्रमुखांनी हाळवणकर यांच्यासोबत चर्चा केली.

 

यावेळी हाळवणकर यांनी पक्षाने अद्याप अधिकृतपणे उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य करून त्यानुसार काम करून दिलेल्या उमेदवारास निवडुन आणण्यासाठी एक दिलाने काम करूया, अशा सुचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -