किरकोळ कारणातून विट आणि चाकूने केलेल्या मारहाणीत शिवम रमेश गिरी आणि रोहित सुरेश गिरी (दोघे रा. शहापूर) हे दोघे जखमी झाले. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी तिघांना अटक केली असून सोहेल नदाफ, इम्रान शेख आणि यश दोणुले अशी त्यांची नावे आहेत. उर्वरीत संशयीतांचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवम गिरी याचा भाऊ रोहित हा व्यायामशाळेतून घरी जात असताना सोहेल नदाफ याच्यासह दोघांनी रोहितला रस्त्यात अडवत आम्हाला ओळखतोस काय? अशी विचारणा करत मारहाण केली.
हा प्रकार भाऊ शिवमला समजताच जाब विचारण्यासाठी दोघे विक्रमनगर परिसरातील बालाजी चौकात पोहचले असता नदाफ याच्यासह त्याच्या साथीदारांनी शिवम याच्यात डोकीत विट मारली तर रोहितच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले.
याप्रकरणी शिवम गिरीबाच्या फिर्यादीनुसार ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी सोहेल नदाफ, इम्रान शेख आणि यश ढोक्षे या तिघांना पोलिसांनी अटक केली.