Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं सकंट, पुढील 36 तास धोक्याचे, आयएमडीचा हायअलर्ट

महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं सकंट, पुढील 36 तास धोक्याचे, आयएमडीचा हायअलर्ट

महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे, परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र तरी देखील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीये, आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

रज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे.त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मुंबई आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट तसेच काही भागात आज गारपिटीचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.गारपिटीचा इशारा देण्यात आल्यानं मोठं संकट यारूपानं महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे.

कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -