Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रBSNL ने आणला स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 395 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे...

BSNL ने आणला स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन; 395 दिवसांच्या वैधतेसह मिळणार हे फायदे

जुलै महिन्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया यांसारख्या अनेक लोकप्रिय कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली होती. त्यानंतर त्यांचे ग्राहक नाराज झाले. आणि अनेक ग्राहकांनी सिम पोर्ट देखील केलेले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वाढवलेल्या रिचार्जचा फायदा बीएसएनएल या कंपनीला मात्र मोठा प्रमाणात झालेला आहे. बीएसएनएल ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. आणि आज काल बीएसएनएलच्या (BSNL Recharge Plan) युजर्सच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

आता नवीन आलेल्या या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी बीएसएनएल त्यांना चांगली सेवा देण्याचा आणि नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे.बदेशातील अनेक शहरांमध्ये त्यांची 4G सेवा देखील चालू केलेली आहे. आणि 5G सेवा चालू करण्याच्या ते तयारीत देखील आहेत. त्यांच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत स्वस्त आणि फायद्याचा प्लॅन लॉन्च केलेला आहे.

 

बीएसएनएलने (BSNL Recharge Plan) लॉन्च केलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 395 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग डेटा सोबत अनेक फायदे देखील मिळणार आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन 13 महिन्यांसाठी आहे. याची खासियत म्हणजे या प्लॅनसाठी तुम्हाला दररोज 7 रुपयांपेक्षाही कमी खर्च येईल. हा एक प्रीपेड प्लॅन आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 2399 एवढी आहे. म्हणजेच या प्लॅनसाठी तुम्हाला तर रोज केवळ 6.57 रुपये खर्च करावे लागतातम तसेच या प्लॅनची वैधता 195 दिवसांची आहे.

 

कोणला लाभ मिळणार ? | BSNL Recharge Plan

या प्रीपेड प्लॅनचा फायदा भारतातील अनेक युजर्सला होणार आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. तसेच तुम्हाला दररोज 2 जीबी हाईट स्पीड इंटरनेट डेटा देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुमचा डेटा संपल्यावर तुम्हाला 40 KBPS या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट वापरता येईल.

त्याचप्रमाणे युजरला दररोज 100 एसएमएस देखील फ्री मिळणार आहे. तसेच व्हॅल्यू ॲडेड सर्विसेसचा देखील लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला हार्डी गेम, अरेना गेम, झिंक म्युझिक, वाव इंटरटेनमेंट, बीएसएनएल ट्यून यांचे सबस्क्रीप्शन देखील फ्री मध्ये मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -