Tuesday, October 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : अट्टल घरफोड्या जेरबंदः चार गुन्हे उघडकीस

इचलकरंजी : अट्टल घरफोड्या जेरबंदः चार गुन्हे उघडकीस

येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने एका अट्टल घरफोड्यास अटक केली आहे. त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. प्रेमचंद उर्फ टल्ल्या राहुल कांबळे (वय २०, रा. कबनूर) असे त्याचे नांव असून त्याच्याकडून २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक

 

सचिन पाटील यांनी दिली. तर यातील आणखीन एक चोरटा यश बागडे (रा. साईट नं.१०२ आसरानगर) हा फरार आहे.

 

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मगदुम मळा परिसरातील निसर्ग रेसिडेन्सी येथे प्रतिक बाबासो चावरे हे राहण्यास आहेत. १४ ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप उचकटून आत प्रवेश करत बेडरुममधील चांदीचे दागिने व रोकड असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

 

या चोरीचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहितीद्वारे ही चोरी प्रेमचंद कांबळे व यश बागडे यांनी केल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार पोलिसांनी प्रेमचंद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या चोरीसह आणखीन तीन ठिकाणी अशा चार गुन्ह्याची कबुली दिली. त्यामध्ये इचलकरंजीतील शिवाजीनगर व शहापूर तसेच सांगली आणि येथील चोऱ्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -