Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात परतीच्या पावसाचा तडाखा; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा तडाखा; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी

महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, गेले अनेक दिवस महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्यात ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच काही भागात ऑक्टबर हिटचा तडाखा देखील जाणवू शकतो.

कोकणात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडार या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यालाही पावसाचा फटका बसणार आहे.मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

दरम्यान गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -