Thursday, November 21, 2024
Homeनोकरीसमाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

समाज कल्याण आयुक्तालयात लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट), लोवर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वॉर्डन, सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे.

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवरांची निवड केली जाणार आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

 

सध्या यूनियन बँकेतदेखील नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -