Saturday, November 2, 2024
Homeक्रीडादिवाळीच्या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

दिवाळीच्या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना! केव्हा, कधी अन् कुठे पाहता येणार?

काही दिवसांपूर्वीच एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारत – पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यातील राडा पाहायला मिळाला होता. शेवटी भारताने पाकिस्तानवर विजयाची नोंद केली होती. आता पुन्हा एकदा भारत – पाकिस्तान सामने एकत्र येणार आहेत.

दिवाळीच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील फॅन्स उत्सुक आहेत. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धेत आणि एशिया कप स्पर्धेत आमनेसामने येत असतात. मग आता या दोन्ही स्पर्धा नाहीत, तर मग हे दोन्ही संघ कुठल्या स्पर्धेत भिडणार आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. केव्हा, कुठे आणि कधी रंगणार सामना? जाणून घ्या.

दिवाळीच्या दिवशी भारत – पाकिस्तान सामना

 

भारतात दिवाळी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. यासह काही ठिकाणी दिवाळीचा सण १ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आता दिवाळीच्या दिवशीच भारत – पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.

 

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ हाँगकाँगच्या सिक्सेस या स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेला येत्या १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरुवात होईल.

हा हाय व्होल्टेज सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी भारताला टी -२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रॉबिन उथप्पाच्या हातात आहे. यासह आणखी ६ खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

 

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

 

रॉबिन उथप्पा (कर्णधार), भरत चिपली, केदार जाधव,

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -