Monday, October 2, 2023
Homeक्रीडाटीम इंडियाचे चार स्टार खेळाडू गंभीर जखमी, द. आफ्रिकावारी रद्द

टीम इंडियाचे चार स्टार खेळाडू गंभीर जखमी, द. आफ्रिकावारी रद्द

न्यूझीलंडविरुद्धची टी-20 आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यातील पहिली कसोटी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकादेखील खेळवली जाणार आहे. लवकरच या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे, मात्र अनेक खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्याला विलंब होत आहे. टीम इंडियाचे चार प्रमुख खेळाडू जखमी झाले असून त्यांना बरे होण्यास वेळ लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत. 

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र