केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक हिताच्या योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यातीलच एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान योजना पी एम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) देशातील लाखो शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा झालेला आहे. या योजनेसाठी एक नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे.
आणि या नियमावलीनुसार वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमिनी खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी आणि मुलांच्या आधार कार्ड देखील जोडावे लागणार आहे.
कुटुंबातील एकालाच मिळणार लाभ | PM Kisan Yojana
केंद्र सरकारने 2019 मध्ये ही पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे 6000 रुपये 2000 रुपयांच्या समान हा तीन हप्त्यात शेतकऱ्यांना वितरित केली जाते. आतापर्यंत या योजनेचे फायदे अनेक शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकरी म्हणून कुटुंबातील पती- पत्नी यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जर सातबाराच्या उताऱ्यावर 2019 पूर्वी तुमची नोंद असेल किंवा वारसा हक्काने जर तुमचे नाव नोंदवले असेल, तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झालेले माहेरवाशिन करून आपल्या नावावर असल्याचे दाखवून लाभ घेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा
शेतकऱ्याचा आठ अ उतारा
लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड
लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार
विहित नमुना अर्ज
शिधापत्रिका