Thursday, November 21, 2024
Homeअध्यात्मआज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

यंदा अमावस्या गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी लागत असली तरी लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबर, शुक्रवारीच करायचे आहे. सध्या लक्ष्मीपूजन ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहे. मात्र, ते शुक्रवारीच (१ नोव्हेंबर) करणे शास्त्रसंमत असल्याचे पंचागकर्त्यांनी म्हटले आहे.

लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त (Laxmi Puja Shubh Muhurat)
१ नोव्हेंबर रोजी प्रदोष काळ सायंकाळी ५.४४ ते रात्री ८.१५, शुभवेळा दुपारी १२.३० ते २, लाभ वेळा रात्री ९.३० ते ११ पर्यंत आहे. वृषभ या स्थिर लग्नाची वेळ सायंकाळी ६.३३ ते ८.३२ अशी आहे. यापैकी कोणत्याही वेळात लक्ष्मीपूजन करता येईल, असे राजंदेकर यांनी स्पष्ट केले आहे.

लक्ष्मीपूजन पूजा विधी (Laxmi Pujan Puja Vidhi)

लक्ष्मीपूजनाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग किंवा पाट ठेवावा, त्यावर लाल कापड अंथरून घ्यावं. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा, त्या कळसामध्ये पाच विड्याची पानं टाकावी, एक रुपयाचं नाणं टाकावं आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंगावर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या-बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची देखील पूजा केली जाते.

दिवाळी 4 दिवस
यंदा दिवाळी ४ दिवस आहे. त्यात ३१ ऑक्टोबर गुरुवारी नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबर शुक्रवारी लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबर शनिवारी दिवाळी पाडवा आणि ३ नोव्हेंबर रविवारी भाऊबीज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -