Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्र2025 ची सुरूवातच होणार विनाशापासून? बाबा वेंगांच्या नव्या भविष्यवाणीने उडवला काळजाचा थरकाप

2025 ची सुरूवातच होणार विनाशापासून? बाबा वेंगांच्या नव्या भविष्यवाणीने उडवला काळजाचा थरकाप

एकूण जागतिक स्थिती बघता, प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात चिंतेत आहे. युद्धजन्य स्थिती, दुष्काळ, पूर, अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे विविध देशांमध्ये सातत्याने जीवित आणि वित्तहानी होत आहे.

 

या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा आणि नॉस्त्रोडॅमस या जगविख्यात ज्योतिष अभ्यासकांनी शेकडो वर्षांपूर्वी वर्तवलेले भविष्य जगाची चिंता आणखीनच वाढवत आहे. सध्या या दोघांनी वर्तवलेल्या भविष्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. आगामी 2025 हे वर्ष जगातील काही देशांसाठी जास्त आव्हानात्मक असेल, असं भविष्य या दोघांनी वर्तवलं होतं. या बाबत सविस्तर जाणून घेऊया. `झी न्यूज हिंदी`ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

बाबा वेंगा आणि नॉस्त्रोडॅमस यांनी वर्तवलेलं भविष्य अचूक मानलं जातं. काही शे वर्षांपूर्वी त्यांनी व्यक्त केलेले अंदाज आज खरे होताना दिसतात. 2025 वर्षासाठी या दोघांनी सांगितलेले अंदाज पुन्हा एकदा इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. 2025 हे विनाशाचं वर्ष असेल, असं या दोघांनी म्हटलं आहे. फ्रान्समधील ज्योतिषी नॉस्त्रोडॅमसच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश होईल. युरोपमधील मध्यभाग यात केंद्रस्थानी असेल. तसेच बुल्गेरियन अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगाने एक विनाशकारी युद्ध होईल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे.

 

बाबा वेंगा या महिला ज्योतिषाने अनेक गोष्टींबाबत भविष्य वर्तवले आहे. तिनं सांगितलं आहे की, 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश होईल. हे जगासाठी संकटाचं वर्ष असेल. याशिवाय 2025 मध्ये पृथ्वीवर इतर जीव देखील आढळतील. टेलीपथीचा देखील विकास होईल. 2025 मध्ये युरोपात मोठा संघर्ष होईल. त्यामुळे या खंडातील लोकसंख्या खूप कमी होईल. सध्याचा भू-राजकीय तणाव आणि संघर्ष पाहता, या भविष्यामुळे चिंता जास्त वाढली आहे.

 

1566 मध्ये नॉस्त्रोडॅमसचे निधन झाले. त्याने ‘लेस प्रॉफेटिज’ या त्याच्या पुस्तकात भविष्यकथन लिहिलेलं आहे. हे पुस्तक पहिल्यांदा 450 वर्षांपूर्वी प्रकाशित झाले होते. या पुस्तकात त्याने अनेक घटनांबाबत भविष्य वर्तवले आहे. हिटलरची हुकूमशाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या तसेच कोविड-19 महामारीचा प्रकोपाबाबत त्याने अचूक भविष्य वर्तवले होते. युरोपातील नागरिकांना भीषण युद्धाचा सामना करावा लागेल. तसेच एक महामारी येईल, जी युद्धापेक्षा धोकादायक ठरेल, असं देखील त्याने सांगितलं आहे.

 

नॉस्त्रोडॅमसच्या भविष्यापैकी एक चांगले भविष्य म्हणजे दोन्ही देशांचे सैनिक थकल्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबेल. ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा स्फोट होईल तसेच मोठा विनाशकारी पूर येईल, असं भविष्यदेखील त्याने वर्तवलं आहे.

 

बाबा वेंगाने वर्षनिहाय काही घटनांविषयी अंदाज व्यक्त केला असून, जग विनाशाकडे कसे वाटचाल करेल, याबाबत देखील भविष्य वर्तवले आहे. 2025 मध्ये युरोपातील संघर्षामुळे खंडाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. 2028 मध्ये मानव शुक्र ग्रहावर ऊर्जेचा स्रोत शोधण्यास सुरूवात करू शकतो. 2033 मध्ये ध्रुवीय बर्फाचे आवरण वितळेल. त्यामुळे समुद्राच्या पाणीपातळीत मोठी वाढ होईल. 2076 मध्ये जगात साम्यवादी विचारसरणी वाढेल. 2130 मानव पृथ्वीवरील इतर जीवांशी संपर्क साधेल.

2170 मध्ये पृथ्वीवर मोठ्या भागात भीषण दुष्काळ पडेल. 3005 पृथ्वी युद्धात लोटली जाईल. 3797 मध्ये मानवाला नाईलाजाने पृथ्वी सोडावी लागेल. 5079 मध्ये जगाचा शेवट होईल, असं भविष्य बाबा वेंगाने वर्तवलं आहे. हे अंदाज पाहता लोकांना हे भविष्य खरं ठरेल की फक्त काल्पनिक कथा आहेत, असा विचार करायला भाग पाडलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -