Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगअंबानी, अदानी नव्हे, सेबीने या उद्योजकावर ठोठावला 50,00,000 रुपयांचा दंड

अंबानी, अदानी नव्हे, सेबीने या उद्योजकावर ठोठावला 50,00,000 रुपयांचा दंड

भारतीय शेअर बाजार नियामक सेबीने उद्योजक सुनिल अर्जन लुल्ला यांच्यावर तब्बल 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. सुनील इरॉस इंटरनॅशनल मिडीयाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमोटर आहेत. सेबीने रेग्युलेटरी नॉर्म्सचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर हा दंड आकारला आहे

.या पूर्वी देखील सेबीने सुनील लुल्ला यांच्यावर गेल्या वर्षी जून 2023 मध्ये अंतरिम निकाल देताना कठोर कारवाई केली होती. सेबीने सुनील लुल्ला यांच्या कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये किंवा अन्य महत्वाच्या प्रबंधकीय पोझिशन स्वीकारण्यावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली होती.

 

या बंदी आदेशात इरॉस ( Eros ) वा तिच्या कोणत्याही सहयोगी वा सेबीत नोंदणी झालेल्या कंपन्यांचा समावेश होता. आता या प्रकरणात सेबीने निकाल देताना सुनील लुल्ला यांच्या मोठा दंड ठोठावला आहे. सेबीने सुनील यांना सिक्युरिटी मार्केटमधून फंड्स डायव्हर्ट करण्यात देखील दोषी मानलेले आहे.

 

ट्रायब्युनल देखील दिला होता झटका

सुनील यांनी जून 2023 मध्ये त्यांच्या विरोधात केलेल्या सेबीने केल्या कारवाईला सिक्युरिटीज अपिलेट ट्रायब्युनल ( SAT ) मध्ये आव्हान दिले होते. ऑगस्ट 2023 मध्ये ट्रायब्युनलने देखील सेबीच्या निर्णयाला योग्य ठरवले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये सेबीने सुनील यांच्या विरोधातील आपला निकाल कायम ठेवला होता.

 

चित्रपट क्षेत्राशी नाते

मुंबई युनिव्हर्सिटीतून कॉर्मस ग्रॅज्युएट असलेल्या सुनील लुल्ला यांचे भारतीय फिल्म इंडस्ट्रीशी अनोखे नाते आहे. मिडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत त्यांचा 20 वर्षांचा अनुभव आहे. 50 हून अधिक चित्रपटांच्या निर्मितीशी त्यांचा संबंध आहे. ते इरॉस एन्टरटेन्मेंट पीएलसीचे चेअरमन किशोर लुल्ला यांचे बंधू आहेत. ते साल 2000 च्या दशकापासून कंपनीत काम करीत असून कंपनीच्या विस्तारात त्यांचे योगदान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -