Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगभाऊबीजेला दोघी बहिणी आनंदाने घरी गेल्या पण…

भाऊबीजेला दोघी बहिणी आनंदाने घरी गेल्या पण…

देशभरात दिवाळी उत्साहाने, आनंदाने साजरी झाली. काल दिवाळीचा शेवटचा दिवस, भाऊबीजेचा सणही उत्साहात , प्रेमाने साजरा झाला. भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण लोक आनंदाने साजरा करतात. मात्र याच सणाला गालबोट लावणारी एक भयानक घटना घडली ज्यामुळे एकच गदारोळ माजला. जिथे आनंद होता, हसण्याचे आवाज येत होते, तीच जागा क्षणभरात दु:खाने झाकोळून गेली, तिथे अश्रूंचा महापूर आला.

असं नेमकं काय घडलं ? ज्या बहिणी आपल्या भावाच्या घरी त्याच्या सुखी आयुष्याची प्रार्थना करायला आल्या होत्या, त्याच बहिणींच आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांचं कुंकूच पुसलं गेलं. दिल्लीत भाऊबीजेसाठी दोन बहिणी भावाच्या घरी आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या पतींमध्ये काही कारणावरून वाद झाला. काही वेळातच पिस्तुलातून गोळीबार झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील खजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयानक घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशी पत्नीसह सासरच्या घरी गेलेल्या दोन मेव्हण्यांचे व्यवसायावरून भांडण झाले. मात्र तो वाद बघता बघता वाढला आणि त्यातच एका व्यक्तीने आपल्या मेहुणीच्या नवऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. संध्याकाळी 6.20 वाजता खजुरी खास पोलीस स्टेशन परिसरात गोळीबाराच्या घटनेबाबत फोन आला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक सोनिया विहारच्या पहिल्या पुस्ता ए ब्लॉकमध्ये घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटू हा भाड्याच्या घरात राहतो. रविवारी भाऊबीजेच्या निमित्ताने त्याच्या दोन बहिणी रेखा आणि चांदनी या त्यांचे पती अजय आणि हेमंतसोबत त्याला भेटायला आल्या. अजय आणि हेमंत हार बनवण्याचा एकच व्यवसाय करतात. मात्र सासरी पोहोचल्यानंतर अजय आणि हेमंत यांच्यात व्यवसायातील काही मुद्यावरून वाद सुरू झाला. बघता बघता तो वाद वाढला आणि रागावलेल्या अजयने हेमंतवर गोळीबार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला.

 

गोळीबारात जखमी झालेल्या हेमंतला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -