आज-काल मोबाईल चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मोबाईल चोर देखील मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरी करत असतात. आतापर्यंत जवळपास 2.85 लाख हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात यश आलेले आहे. या शोधलेल्या मोबाईल पैकी 21000 मोबाईल जप्त केलेले आहे, तर 6.8 लाख फोन ब्लॉक करण्यात आलेले आहे. सरकारी आकडेवारीनुसार आपल्या देशात दर महिन्याला जवळपास 50 हजार मोबाईल चोरीला जातात.
या मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने साथी पोर्टल सुरू केलेले आहे. हे पोर्टल 16 मे पासून चालू करण्यात आलेले आहे. या पोर्टल द्वारे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल ट्रॅक करून त्यांना ब्लॉक करण्यात आलेले आहेत. यासाठी काही गोष्टी लॉन्च देखील करण्यात आलेल्या आहेत. दोन महिन्यातच अनेक चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन सापडलेले आहेत.
याबाबत दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे पोर्टल अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रदान करते. जप्त झालेल्या मोबाईल फोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याद्वारे मोबाईलचे नेमके ठिकाण शोधले जाऊ शकते. यामुळे चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झालेली आहे. पोलीस चोरट्यांना शोधून काढू शकतात. मोबाईल चोरी तसेच फ्रॉड अशा फसवणुकीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी हा एक चांगला उपक्रम आहे.
या सरकारच्या साथी पोर्टलच्या माध्यमातून आता मोबाईल युजर्सला त्यांच्या नावावर आणखी कनेक्शन घेण्यात आले आहे की नाही याची माहिती देखील मिळते. हरवलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधता येते. तसेच आयएमइआय क्रमांक मिळून आपण तो मोबाईल ब्लॉक करू शकतो. आणि हा फोन ब्लॉक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला वापरता येत नाही.
चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधायचा ?
हा मोबाईल शोधण्यासाठी तुम्हाला संचार साथी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
होम पेजवर तुम्हाला लॉस्ट युजर मोबाईल स्क्रोल करण्याचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा त्यानंतर ब्लॉक किंवा मिसिंग मोबाईल या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर एक फॉर्म ओपन होईल. यामध्ये फोनशी संबंधित असणारी माहिती द्यावी लागेल. जसे की मोबाईल आयएमआय नंबर, डिवाइस मॉडेल, त्याचप्रमाणे कंपनीचे नाव आणि मोबाईलच्या बिलाची प्रत देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला सरकारी आयडी नंबर, नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल सह तुमची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल. आणि तुमचे ओळखपत्र देखील अपलोड करावे लागेल.
यानंतर तुमच्या फोनमध्ये दुसरे सिम टाकताच त्याचे लोकेशन तुम्हाला समजेल आणि तुम्हाला तो फोन ब्लॉक करता येईल.



