Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंगसोन्याचे दर कोसळले, चांदीही तब्बल 8000 रुपयांनी स्वस्त, गेल्या चार तासांमध्ये मोठा...

सोन्याचे दर कोसळले, चांदीही तब्बल 8000 रुपयांनी स्वस्त, गेल्या चार तासांमध्ये मोठा उलटफेर

मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदी देखील स्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे सराफा बाजारात सोन्याला मागणी असताना देखील सोन्याचे दर कोसळले आहेत. सुवर्णनगरी अशी जळगाव शहराची ओळख आहे. जळगावच्या सराफा बाजारात गेल्या चार तासांमध्ये सोन्याचे दर तोळ्यामागे तब्बल दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. तर चादींच्या दरात किलोमागे तब्बल आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. 22 कॅरट सोन्याचे दर चार तासांपूर्वी प्रती तोळा 79 हजार होते. तर चार तासांमध्येच भावात दोन हजारांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 77000 रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत.

 

चांदीच्या दरातही मोठी घसरण

 

दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर गेल्या चार तासांमध्ये किलोमागे तब्बल आठ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे दर आता प्रती किलो 93000 हजार रुपये इतके आहेत. चांदीच्या दरात किलोमागे आठ हजार तर सोन्याच्या दरात प्रती तोळा दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

 

सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. आज अचानक सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानं सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. ऐन दिवाळीमध्ये सोन्याचा भाव हा 80 हजार 400 वर तर चांदीचा भाव एक लाखांवर पोहोचला होता. त्याच भावात आज अचानक घसरण झाल्यानं जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे.

 

सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

 

दरम्यान सध्या जरी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत असलं, तरी देखील येत्या काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असून, सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे, भविष्यात सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होऊ शकते. परिणामी सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -