Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीएका झटक्यात ७० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी…शरद पवार यांनी सांगितला तो...

एका झटक्यात ७० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी…शरद पवार यांनी सांगितला तो किस्सा

शेतकरी देशातील अन्नाची गरज भागवू शकतो. सध्या शेतकरी आत्महत्येचा प्रश्न आहे. कापूस, सोयाबीनचे दर पडले. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची दुःखद बातमी आली होती. त्यामुळे मी मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे किती आवश्यक आहे, ते सांगितले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना ७० हजार कोटी रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. वर्धा येथील हिंगणघाटमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले शरद पवार

आता विधानसभेची निवडणूक ही लोकांचे प्रश्न काय, त्यांची सोडवणूक करण्यासाठी आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा वर्धा येथे आमचा उमेदवार निवडून देण्याचे काम तुम्ही केले. त्यावेळी देशात सत्ता बदलेले, अशी आमची अपेक्षा होती. कारण देशाने गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारचे काम पाहिले. मोदी यांनी या दहा वर्षांच्या काळात लोकांचे प्रश्न सोडवले नाही. आज पुन्हा त्यांच्या हातात सत्ता गेली. पण आत्ताची स्थिती वेगळी आहे. लोकांनी त्यांना मतदान केले. पण ते स्वत:च्या ताकदीवर सत्तेत येऊ शकले नाही

नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता आहे. त्याचा वापर कसा केला, देशात ११५ कोटी लोकांसाठी धोरणं करण्याची आवश्यकता आहे. उद्याच्या निवडणूकमधून आता निकाल द्यायचा आहे. कारण शेतकऱ्यांना लागणारी खतं, औषधं महाग झाली. शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. पण शेतमालास भाव नाही.

निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद

सरकारने लोकप्रिय योजना काढल्या आहे. परंतु या योजना निवडणुकीसाठी आहे. मतदान संपल्यावर या योजना बंद होणार आहे. लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना बंद होणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. देशपातळीवर आम्ही लोकांना एकत्र आणले. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आम्ही एकत्र आलो आहे. महायुतीची सत्ता यांच्या हातून घालवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली आहे.

पाच गोष्टीची गॅरंटी आम्ही जाहीर केली आहे. महिलांना ३००० हजार, एसटी महिलांसाठी मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ, जातीय जनगणना, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा आम्ही हटवू. बेरोजगारांना महिन्याला ४००० रुपये गॅरंटी जाहीर केली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -