Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडी'तर कोर्टात खेचेन', सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

‘तर कोर्टात खेचेन’, सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

“पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन, या आशयाची नोटीस वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठवली”, असा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (दि.8) वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार बापू पठारे यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत त्या बोलत होत्या.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्व महत्त्वाचे प्रश्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात सविस्तर मांडले. मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. कारण सुषमा अंधारे यांना देखील ती माहिती नाही. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो. एका वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती. असं काही होईल असं कोणाच्या ध्यानीमनी देखील आलं नव्हतं. ज्यांच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे. मागच्या वेळीच तिकीट शरद पवारांच्या सहीवर मिळालं. त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ज्या पोर्शे कारचा उल्लेख सुषमा ताई तुम्ही केला. तुम्ही त्या प्रकरणात लढलात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण सुषमा ताई पोलीस स्टेशनला बसलात. रवींद्र धंगेकर देखील तेथे होते.

 

ज्यांचा जीव गेला, त्यांच्या आई-वडिलांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. करोडो रुपयांची पोर्शे कार होती. त्या व्यक्तीला स्थानिक नेत्याने पिझ्झा खायला घातला. हे वास्तव आहे. याच्याबद्दल मीही बोलले, सुषमा ताई तुम्ही बोललात. यावर आदरणीय पवार साहेबही बोलले. सुषमाताई तुम्हाला कदाचित ही गोष्ट माहिती नसेल की, ज्या 80 वर्षांच्या योद्ध्याने त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली. ज्यांच्यामुळे ते निवडून आले. त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे की, पोर्श प्रकरणात जर माझी बदनामी केली तर मी कोर्टात खेचेन, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

 

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी 100 वेळा त्या नेत्याला आव्हान करते. पोर्शे अपघातात ज्यांची हत्या झाली, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी कृती केली, त्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात. हिंमत असेल तर सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंना देखील नोटीस पाठवा. आम्ही लढू कारण आम्हाला कोणाची भिती नाही. आम्हाला माहिती नाही, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -