Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीणचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून...

लाडकी बहीणचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो : धनंजय महाडिक

“लाडकी बहिणी योजनेचे पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावं लिहून घ्या. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया आहेत, महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे म्हणत आहेत”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. ते कोल्हापुरातील प्रचार सभेत बोलत होते.

 

धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. कोण लय बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिलाय. राजकारण करत आहात या पैशांचं? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरिब महिलेला देऊ आम्ही, पण असा दुगलेपणा येथून पुढे चालणार नाही. त्यामुळे आपण जागृत राहिलं पाहिजे, असंही महाडिक म्हणाले.

 

धनंजय महाडिकांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची टीका

धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश दिलेत. काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. हाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त 1500 रुपये? लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली. सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, आमच्या आया बहिणीना भाजप पासूनच धोका आहे.

 

धनंजय महाडिकांची मुजोरी सतेज पाटलांची टीका

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हणाले, भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी महिलांना जाहीर सभेत धमकी दिली. काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या..आम्ही व्यवस्था करतो त्यांची

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -