Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्रभर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय...

भर सभेत फोन, पुढची सभा रद्द; भाषण सुरु असताना मंचावर नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी सर्व सांगितलं, 

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वंच राजकीय पक्षांची विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) देखील अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. काल राज ठाकरे यांच्या तीन जाहीर सभा होत्या. यामध्ये पहिले बोरीवली, मग वर्सोवा आणि शेवटी प्रभादेवी येथे राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती. याचदरम्यान बोरीवली येथे सभा सुरु असताना राज ठाकरेंना अचानक फोन आला आणि तुमची सभा लाईव्ह वर्सोवा येथे देखील दाखवण्यात येत आहे, असं सांगितले.

 

 

नेमकं काय घडलं?

राज ठाकरेंच्या काल सायंकाळी बोरीवली, वर्सोवा आणि प्रभादेवीमध्ये सभा होत्या. बोरीवली येथील सभा संपणारच होती, तेवढ्यात राज ठाकरेंना एक फोन आला. त्यांनी आपले भाषण थांबवले आणि फोनवर बोलू लागले. यानंतर राज ठाकरेंनी नेमकं काय संभाषण झालं, कोणाचा फोन आला होता, हे भर सभेत सांगितलं. दरम्यान, माझ्याकडे वेळ कमी आहे. त्यातून मुंबईचा ट्राफिक आणि त्याचा झालेला विचका…त्यातून मार्ग काढत काढत मी इथपर्यंत पोहोचलो. दिवसाला तीन- चार सभा चालू आहेत. मी आलो आहे ते तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि सहज चार गोष्टी सांगण्यासाठी…बोरीवलीला मला सभा घ्यायचीच होती. यादीमध्ये नसलं तरी मी ती घेतली. अत्यंत सभ्य उमेदवार तुम्हाला मी दिला आहे. चांगला अभ्यासू असा हा उमेदवार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

 

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले की बोरीवलीनंतर मला वर्सोवाला जायचं होतं. त्यानंतर प्रभादेवीमध्ये पोहचायचं होतं. परंतु आताची वेळ पाहता आणि मुंबईतील ट्राफिक पाहता हे शक्य नव्हतं. त्यामुळे मला शेवटची सभा रद्द करावी लागली असती. परंतु मला आता वर्सोव्याचे आमचे जे उमेदवार आहेत, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावली आहे. तुमची सभा आम्ही मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवतोय, असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही बोरीवली इथूनच बोला आम्ही ते वर्सोव्याच्या सभेच्या ठिकाणी लाईव्ह दाखवतो. त्यानंतर राज ठाकरेंनी वर्सोवामधील जाहीर सभा रद्द केली आणि ते प्रभादेवी येथील सभेसाठी रवाना झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -