Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूर‘लाडक्या बहीणीं’बाबतचं विधान भोवलं; भाजप खासदार धनंजय महाडिकांविरोधात गुन्हा दाखल

‘लाडक्या बहीणीं’बाबतचं विधान भोवलं; भाजप खासदार धनंजय महाडिकांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूरात महायुतीच्या सभेतील एका विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणामध्ये धमकी वजा इशारा दिल्याचे म्हणत आयोगाने दिलेल्या फिर्यादीवरून महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा करण्याची नोटीस दिली होती. नोटीशीमध्ये असमाधानकारक उत्तर आल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

 

धनंजय महाडिकांचं विधान वादात

महायुतीच्या प्रचारसभेत धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवर एक विधान केलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढून घ्या, असं धनंजय महाडिक म्हणाले. त्याच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला. विरोधकांकडून धनंजय महाडिकांवर हल्लाबोल केलाय.

 

जर इथं काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या. ज्या आपल्या योजनेचे 1500 रूपये घेतात. त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढा त्यांची नावं लिहून घ्या. बरोबर आहे की नाही…. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि जायचं त्यांच्या रॅलीत असं नाही चालणार. काही लोक छाती बडवत होते. आम्हाला नको पैसै… आम्हाला नको पैसै आम्हाला सुरक्षा पाहिजे, असं म्हणत होते. पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडं द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कुणी मोठ्यानं भाषण करायला लागली. दारात आली तर लगेच फॉर्म द्यायचा. म्हणायचं बाई तुला नको आहेत ना पैसै? मग यावर सही कर म्हणायचं. लगेच उद्यापासून पैसे बंद करतो म्हणायचं. आमच्याकडं काय पैसे लय झालेले नाहीत, असं धनंजय महाडिक म्हणालेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -