Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगBSNL ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 150 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार हे...

BSNL ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 150 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार हे फायदे

यावर्षी जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक देखील नाराज झालेले आहेत. आणि तेव्हापासून बीएसएनएल कंपनीचे चांगले दिवस यायला लागलेले आहेत. बीएसएनएल ही एक सरकारी ही कंपनी आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये 50 लाख नवीन बीएसएनएल सोबत जोडले गेलेले आहेत. आता बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते.

 

तुम्ही तर bsnl चे (BSNL New Plan) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे. त्यामध्ये तुमचे सिम रिचार्ज न करता देखील पाच महिने ऍक्टिव्ह राहू शकेल. जर तुम्हाला तुमच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त पैसे खर्च करायचे नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे .

 

बीएसएनएलचा 150 दिवसांचा प्लॅन | BSNL New Plan

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन 150 दिवसांचा व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन आणला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याची व्हॅलीडिटी जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पाहिजे पैसे खर्च करावे लागणार नाही. आता आपण या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

 

बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी एक चांगला प्लॅन कंपनीने लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देत आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. हा प्लॅन तुम्हाला केवळ 397 मध्ये खरेदी करता येईल. आणि या प्लॅनची व्हॅलिडीटी दीडशे दिवसांची आहे.

 

या प्लॅनच्या पहिल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच पहिल्या 30 दिवसांमध्ये डेटाचे देखील अनेक फायदे आहेत. कंपनी त्यांच्या ग्राहकांना 30 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा ऑफर करते. तसेच डेटा लिमिट संपल्यावर देखील तुम्हाला 40 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरता येईल. तुम्हाला मोफत कॉलिंग आणि डेटासह 100 मोफत एसएमएसचा देखील लाभ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -