Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअशाप्रकारे आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

अशाप्रकारे आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे. आपल्या भारतीय नागरिकत्वाचा हा एक महत्त्वाचा आपला ओळखीचा पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक कामात आपल्याला आधार कार्ड लागतेच. अगदी शाळांपासून ते सरकारी कामांकरिता आधार कार्ड लागते. आधार कार्डवर आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन असते. आपला पत्ता,लिंग त्याचप्रमाणे मोबाईल नंबर या सगळ्याची माहिती असते. ज्यावेळी आपण कोणत्याही ठिकाणी आपल्या आधार कार्ड जमा करतो. त्यावेळी लॉगिन केल्यानंतर त्यांना एक ओटीपीची गरज असते. आपल्या ओटीपीशिवाय आपल्याला आधार कार्ड कुठेही लॉगिन करता येत नाही.

 

आणि आधार कार्डचा हा ओटीपी येण्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे असते. जर तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर अनेक समस्या येतात. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड लिंक नसेल, तर ते आत्ताच लिंक करून घ्या. यासाठी तुम्हाला जास्त पैसे देण्याची देखील गरज नसते. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही हे काम करू शकता. आता मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक कसा करायचा? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला अनेक बँकिंग सेवा उपलब्ध होत नाही. तसेच मोबाईलच्या सेवा देखील मिळत नाही. कारण आधार कार्ड कुठल्याही कामाची लिंक करताना त्याचा ओटीपी द्यावा लागतो. आणि तो ओटीपी आपल्या मोबाईल नंबर वर येत असतो.

 

आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ?

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला जावे लागेल. आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डिटेलसाठी नोंदणी केंद्रावर जाऊन त्यासाठी प्रक्रिया करावी लागेल.तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर केवळ आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुमची बायोमेट्रिक डिटेल्स द्यावे लागणार आहे. आणि हे काम ऑफलाइन केले असेल, तर सर्व कागदपत्र सोबत जोडावी लागणार आहे. यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -