Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रपालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद...

पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण…

विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरू असतानाच राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसारच्या स्कूल बससंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओच्या सूचननेनुसार 19 आणि 20 नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता लागू शकते. त्यामुळेच 2 दिवशी स्कूल बस(School Bus) विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र घेतला आहे.

 

मतदानामुळे शाळांना 20 तारखेला सुट्टी असल्याने त्या दिवशी पालकांना काही प्रश्न पडणार नाही. मात्र 19 तारखेला स्कूल बस (School Bus)नसल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करत, अथवा सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. पालकांना मुलांना मतदानाच्या आदल्या दिवशी शाळेत कसं सोडायचं हा प्रश्न असणार आहे.

 

मुंबईतील सुमारे एक हजार स्कूल बस चालकांसह निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदान यंत्रे, इतर सामान तसेच अधिकारी-कर्मचारींनाही प्रवासासाठी स्कूल बसचा वापर करण्यात येणार आहे. या बस 18 नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यामुळेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी 19 नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने 19 आणि 20 तारखेला स्कूल बस विद्यार्थ्यांच्या सेवेत उपलब्ध नसतील असा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे तर निकाल 23 तारखेला लागणार आहे. असं असतानाच आता राज्य सरकारने 20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर करत असल्याचं परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं आहे. प्रत्येक मतदान करणाऱ्या व्यक्तीसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला लागू राहणार आहे. पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी वा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सदर आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

 

निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं हा संवैधानिक अधिकार असून तो बजावताना अडथळा येऊ नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते. यंदा महाराष्ट्रामध्ये मतदान बुधवारी असल्याने महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त मीडवीक ऑफ मिळणार आहे. मात्र या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -