Wednesday, November 13, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?

पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?

राज्यभरात निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी तपासामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडत आहे. अशातच मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये काल (सोमवारी) पुन्हा एकदा रोकड सापडल्याने खळबळ उडाली. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युन गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आलेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. मात्र गाडीत कोणत्याच पक्षाशी संबंधित चिन्ह अथवा वस्तू आढलेल्या नाहीत. त्यामुळं ही रक्कम कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप ही कोणता खुलासा केलेला नाही.

 

काळोखे आणि बसे दोघे ही बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळं या दोघांना समजपत्र देऊन, ही रक्कम शासनाकडे जमा करून घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. रविवारी सुद्धा सचिन मुर्हे या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यलयात 36 लाख 90 हजारांची रोकड आढळली, त्यानंतर घरी जाऊन तपासणी करण्यात आली. तर घरी सुद्धा 15 लाखांची रोकड सापडली. मुर्हे सुद्धा पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसामोर निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही प्रकरणांनी मावळ विधानसभेचे राजकारण पुन्हा ढवळून निघालेलं आहे. मावळ विधानसभेत पैशांचं वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत, तक्रारींची शहानिशा केल्यावर दोन ठिकाणी रोकड ही आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. तपासणीत कोणत्या ही पक्षाशी संबंधित वस्तू आढळले नसल्यानं ही रोकड नेमकी कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

 

मावळमध्ये 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त

 

गेल्या काही दिवसांपुर्वी मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कारचालक पियुष जखोडीया (वय 34) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मावळमध्ये शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या कारची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कारमध्ये रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केल्यानंतर कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगण्यात आले. तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केल्याचे मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -