सध्या कांद्याचे दर हे उच्चांकाला पोहोचलेले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे दर उच्चांकावर गेलेलं आहे. केंद्र सरकारने देखील आता कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये (Onion Price) लक्षणीय वाढ झालेली आहे. कांद्याचे दर हे 21 टक्क्यांनी वाढलेले असून सध्या 60 रुपये प्रति किलो पेक्षाही जास्त दराने कांदा विकला जात आहे. यामुळे अन्नधान्याच्या महागाईवर देखील परिणाम होताना दिसत आहे.
जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये महागाईच्या आकडेवारीमध्ये वाढ झाली तर रिझर्व बँकेच्या व्याजदर देखील कपात होण्याच्या लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ज्या राज्यांमध्ये कांदा तयार झालेला नाही. त्या राज्यांमध्ये रेल्वेने कांद्याचा (Onion Price) पुरवठा करण्याचा प्रयत्न गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार करत आहे.
यामुळे कांद्याची उपलब्धता वाढली आहे. परंतु दर मात्र अजिबात कमी झालेले नाही. आता तो दर पाच वर्षांच्या उच्चांकावर गेलेला आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका चालू होत आहेत. परंतु कांदा उत्पादक शेतकरी यामुळे नाराज होऊ नये. यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली असल्याचे देखील बोलले जात आहे. कांद्याचे दर काही दिवस असेच वाढत राहिले, तर राष्ट्रीय पातळीवर महागाई आणखी भडकण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर हा 5.5 पेक्षा जास्त झालेला आहे. याबद्दलची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर लक्ष्मीकांत दास यांनी दिलेली आहे.