जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे विचार उपयोगी पडतील. तुम्ही त्यांच्या विचारावर कृती केली तर यश तुमच्या पुढ्यात येईल. काय आहेत ते विचार?
जग तुमच्या आत्मसन्मानाचा काही करून दाखवल्याशिवाय बिलकूल विचार करणार नाही. जगाकडून आत्मसन्मान मिळवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी कर्तृत्व गाजवून दाखवावे लागेल.
यशाचा आनंद लुटा पण त्याचवेळी अपयश का आले याचं कारण जाणून घ्या. अपयश आले तरी खचून जाऊ नका. धैर्य ठेवा. धैर्य हेच यशाची पहिली पायरी आहे.
दुसऱ्याशी तुमची तुलना करणे थांबवा. तुलना करत राहाल तर स्वत:चीच किंमत कमी कराल. तेव्हा तुलना नको, तुम्ही स्वत:ला वेळ द्या. निष्णात व्हा.
व्यवसाय हा पैशांचा खेळ आहे. त्यात अनेक नियम आहेत आणि त्याहून अधिक जोखीम आहे. सध्याच्या काळात जो इतरांना सक्षम करेल. दुसर्यांना ताकद देईल. तोच नेता असेल.
मूर्ख व्यक्तीसोबत चांगले राहा. शक्यता आहे की तुम्ही सध्या एखाद्या मूर्खासाठीच काम करत असाल. मोठं काही करून दाखवण्यासाठी मोठी जोखीम घेण्याची तयारी पण ठेवा.