Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रSagility India चा आयपीओ आला, आता पुढे काय? भविष्यात कंपनी दमदार रिटर्न्स...

Sagility India चा आयपीओ आला, आता पुढे काय? भविष्यात कंपनी दमदार रिटर्न्स देणार का?

आरोग्य क्षेत्रात टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स देणाऱ्या Sagility India या कंपनीता आयपीओ आता शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओला तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. या वर्षात आलेल्या काही आयपीओंनी चांगले रिटर्न्स दिले तर काही आयपीओंनी निराशा केली. हा आयपीओदेखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. Sagility India हा आयपीओदेखील शेअर बाजारावर फारशी कमाल न करताच लिस्ट झाला. याआधी Afcons Infrastructure हा आयपीओदेखील शेअर बाजारावर फारशी कमाल करू शकला नव्हता.

सॅजिलिटी इंडिया या आयपीओचा किंमत पट्टा 28 ते 30 रुपये ठेवण्यात आला होता. या कंपनीचा शेअर 3.50 टक्क्यांच्या प्रिमियावर लिस्ट झाला आहे. 3.53 टक्क्यांच्या प्रिमियमसह ही कंपनी बीएसई आणि एनएसईवर 31.06 रुपयांवर लिस्ट झाली.

Sagility India Listing नंतर आता पुढे काय?
या कंपनीच्या शेअरला जीएमपीवर फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष शेअर बाजारावर सूचिबद्ध होतानाही ही कंपनी फारशी कमाल दाखवू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दोन वर्षांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवून या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातोय. शॉर्टमसाठी गुंतवणूक करायची असेल तर IPO प्राईसच्या खाली स्टॉपलॉस लावून गुंतवणूक करता येईल.

Sagility India IPO Details

सॅजिलिटी इंडिया कंपनीचा आयपीओ 3.20 पट सबस्क्राईब झाला होता. या कंपनीने आपयीओच्या माध्यमातून एकूण 38,70,64,594 शेअर्स विकण्यासाठी काढले होते. प्रत्यक्ष लोकांनी 1,23,99,75,500 शेअर्ससाठी बोली लावली. या कंपनीची सुरुवात जुलै 2021 मध्ये झालीह होती. US हेल्थकेअर इंडस्ट्रीच्या ग्राहकाना टेक-अनेबल्ड बिझनेस सोल्यूशन्स आणि सर्व्हिसेस देण्याचे काम ही कंपनी करते. अमेरिकेतील हेल्थ इन्सुरन्स कंपन्या, हॉस्पिटल, फिजिशियन्स, डायग्नॉस्टिक्स, मेडिकल डिव्हाईस कंपन्या आदी या कंपनीचे ग्राहक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -