सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे. त्यातील एक सगळ्यात मोठी आणि हितकारी योजना म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) योजना. या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते. तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात. अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता रेशन संबंधित तुम्हाला कोणतीही तक्रार असेल, तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेला आहे. या ॲपचे नाव रेशन न्यू ॲप असे आहे. या ॲपद्वारे सरकार जवळपास 80 कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असते याची माहिती आहे. परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणतीही तक्रारी असेल तर तुम्ही या ॲपवर तक्रार करू शकता.
सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना अत्यंत महत्त्वाकांशी दृष्टीने सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश हा देशातील स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षितता निश्चित करणे तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्याची राबवण्यात येणारी, ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदे अंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देते.
या शिधापत्रिकाधारकांना आता त्यांच्या अन्न हक्काचा देशातून कुठूनही लाभ घेता येणार आहे. सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सरकारनेही वन नेशन वन रेशन कार्ड योजना 2019 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते. यासाठी आता रेशन कार्डला आधार कार्ड क्रमांक लिंक करणे देखील खूप गरजेचे आहे.
आता रेशन कार्ड द्वारे (Ration Card) जे रेशन घेतात, त्यांच्यासाठी 1 नोव्हेंबर पासून नियम बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार जर तुम्ही तुमचे इ केवायसी केलेले नसेल, तर तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार नाही. त्यामुळे केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर अजूनही की ई केवासी केले नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. कारण 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढे अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही.