Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगया’ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

या’ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस(rain) सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता दर्शवत यलो अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागानुसार तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कांचीपुरम, रानीपेट, कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी, तेनकासी, रामनाथपुरम, विरुधुनगर आणि मदुराई जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

तसेच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागान केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस(rain) पडू शकतो, असा देखील हवामान विभागाकडून इशारा दिला आहे.

 

गेल्या महिन्याभरापासून राजधानी चेन्नईसह जवळपास संपूर्ण तामिळनाडूमध्ये पुढील काही दिवस वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मुसळधार पावसाचा अंदाज पाहता परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस पडेल, असे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, संभाव्य पूर आणि पाणी तुंबण्याचा इशारा दिला आहे.

 

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि तामिळनाडू आपत्ती प्रतिसाद दलाला बाधित भागात आगाऊ तैनात करण्याचे निर्देश दिले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, यावर स्टॅलिन यांनी भर दिला. तसेच वृद्धाश्रम आणि निराधार गृहांमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

 

सध्या देशात तीन प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात हिमवर्षाव सुरू झाला असून, मैदानी भागात धुक्यासोबतच दिवस आणि रात्रीच्या तापमानातही झपाट्याने चढ-उतार होत आहेत. तर दक्षिण भारतात परतीच्या मान्सूनमुळे पाऊस पडत आहे. तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. साधना टॉप, गुरेझ, पीर पंजाल रेंज, पीर की गली, काश्मीर खोऱ्यातील कुपवाडामधील सोनमर्ग आणि लडाखच्या झोजिला पासमध्येही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -