आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. परंतु आता याच क्रेडिट कार्ड असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे.
कारण 15 नोव्हेंबर पासून क्रेडिट कार्ड संबंधित अनेक नियम बदलणार आहे. आणि त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यभर देखील होणार आहे. या बदलणाऱ्या नियमांमध्ये विमानतळ लाउंज प्रवेशापासून ते युटिलिटी व्यवहार आणि रिवॉर्ड पॉइंट पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
येत्या दोन दिवसात म्हणजेच 15 नोव्हेंबर पासून आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आणि या बदललेल्या नियमांमुळे आता रिवॉर्ड पॉइंट्स ट्रांजेक्शन फीवर यांच्यावर परिणाम होणार आहे. या बदलणाऱ्या नियमांपैकी आता icici बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना विमानतळावरील लाऊंजमध्ये मोफत प्रवेशासाठी त्यांच्या कार्ड मधून 75 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ 35 हजार रुपये एवढी होती.
त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्डधारकांसाठी इंधन अधिभार माफीचा नियम बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ साठी दर महिना 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकेकडून इंधन अधिकार मोफत असणार आहे. ही मर्यादा प्रति महिना 1 लाख रुपये एवढी असणार आहे.
युटिलिटी व्यापाराअंतर्गत तुम्ही प्रीमियम क्रेडिट कार्डवर 80 हजार रुपयांपर्यंतचा मासिक खर्च आणि या मर्यादेपर्यंतच्या विमा पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकता. तसेच इतर कार्डसाठी ही मर्यादा मासिक खर्च 40 हजार रुपयांपर्यंतच्या विमा पेमेंटची असेल. ज्यामध्ये तुम्हाला अनेक रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतील. त्याचप्रमाणे प्रीमियम क्रेडिट कार्ड धारक किराणा मालावर 40000 रुपयांपर्यंत मासिक खर्चावर रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. आयसीआयसीआय बँकेच्या नवीन नियमानुसार आता बँकेने सप्लीमेंट्री कार्ड धारकांवर 199 रुपये वार्षिक शुल्क लागू केलेले आहे.