Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र50 लाख दे नाहीतर…; शाहरुख, सलमाननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

50 लाख दे नाहीतर…; शाहरुख, सलमाननंतर प्रसिद्ध अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर अनेक सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खानला तर दिवसागणिक धमक्या येत आहेत. त्यानंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. अशातच आता शाहरुख, सलमाननंतर एका प्रसिद्ध अभिनेत्रीला(Actress) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिनेत्रीला एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. फोन करणाऱ्यानं तिच्याकडे 50 लाखांची मागणी केली असून जर पैसे दिले नाहीतर, तिला जीवेमारलं जाईल, असं देखील सांगितलं होतं.

 

सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता भोजपुरी अभिनेत्री (Actress)अक्षरा सिंहला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. अभिनेत्रीला एका अनोळखी नंबरवरून तिच्या जीवाला धोका असलेला फोन आला आहे. फोन करणाऱ्यानं तिच्याशी गैरवर्तन केलं आणि 50 लाख रुपयांची खंडणीही मागितली. फोन केल्यानंतर अभिनेत्रीनं दानापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

 

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तिच्या तक्रारीत भोजपुरी अभिनेत्रीनं सांगितलं की, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 12:20 वाजता तिला दोन वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आले. तिचा फोन येताच कॉलरनं तिला शिवीगाळ करून धमकावलं. त्यानंतर, दोन दिवसांत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी फोन करणाऱ्यानं दिली आहे.

 

पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत कुमार भारद्वाज यांनी अभिनेत्रीला आलेल्या धमकीच्या फोनसंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहनं तिच्यावर खंडणी मागितल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले की, “परिस्थिती तपासली जात आहे. फोन करणाऱ्यांची लवकरच ओळख होईल.”

 

 

अक्षरा सिंह भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रवि किशन स्टारर ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. ती ‘सत्या’, ‘ताबादला’ आणि ‘मां तुझे सलाम’ यासह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये दिसली आहे आणि अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. अक्षरा तिच्या दमदार अभिनय आणि गायनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. अक्षरा सिंहने टीव्हीवरही काम केले आहे. त्याने अनेक मालिका केल्या आहेत. ती 2015 मध्ये काला टीका आणि सेवा वाली बहू या टीव्ही शोमध्ये दिसली होती. अक्षरा सूर्यपुत्र कर्ण आणि पोरस सारख्या पीरियड ड्रामा मालिकांमध्येही दिसली आहे. अक्षरा ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोचाही भाग राहिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -