जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी टेलीकॉम कंपनी यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. आणि त्यानंतर बीएसएनएल (BSNL) या सरकारी कंपनीचे मात्र अच्छे दिन यायला सुरुवात झालेली आहे. कारण अनेक ग्राहक हे बीएसएनएल कडे वळालेले आहेत. नुकतेच कंपनीने त्यांचा लोगो देखील बदललेला आहे. आणि आता ही कंपनी देशभरातील त्यांच्या युजरसाठी अनेक सुविधा देखील सुरू करणार आहे. खाजगी टेलीकॉम कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेडने भारत देशातील पहिली सॅटेलाईट टू डिवाइस सर्विस लॉन्च केलेली आहे. याबाबतची माहिती दूर संचार विभागाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेली आहे. त्यामुळे आता बीएसएनएल वरून तुम्हाला कॉल आणि एसेमेस करण्यासाठी नेटवर्कची गरज भासणार नाही. बीएसएनएलने यासाठी अमेरिकेच्या वीएसाट कंपनीसोबत पार्टनरशिप देखील केलेली आहे.
बीएसएनएलने त्यांच्या एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये यात्रेकरू डोंगराळ भागातून प्रवास करत आहे. परंतु त्यांचे नेटवर्क जाते. आणि बीएसएनएलची सॅटॅलाइट टू सर्विस मदत करते. या सर्विसच्या माध्यमातून तो व्यक्ती कॉल करतो आणि या सर्विस चा लाभ घेतो.
बीएसएनएलच्या या सॅटॅलाइट टू डिवाइस सर्विस ट्रायल देखील पूर्ण झालेले आहे. बीएसएनएलच्या या सर्विस मधून आता इमर्जन्सी कॉल, मेसेज, यूपीआय पेमेंट देखील करता येते. आयफोन 14 ने पहिल्यांदा ही सर्विस लाँच केली होती. यानंतर इतर मोबाईल कंपन्यांनी देखील या सर्विसला सपोर्ट करणारे डिव्हाईस आणलेले होते. परंतु आता बीएसएनएलने पहिल्यांदाच भारतात फायबर आधारित इंटरनेट टीव्ही सुविधा सुरू केलेली आहे. आणि याला त्यांनी आयएफटीव्ही असे नाव दिलेले आहे. या सुविधेतून आता लाईव्ह टीव्ही चॅनल आणि पे टीव्ही सुद्धा मिळणार आहे. तसेच लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला मिळणार आहे.