Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रस्मार्टफोनमुळे खिशाला लागणार कात्री, किंमतीत 5 टक्के होणार वाढ? कारण…

स्मार्टफोनमुळे खिशाला लागणार कात्री, किंमतीत 5 टक्के होणार वाढ? कारण…

पुढील वर्षापर्यंत स्मार्टफोनच्या किंमती 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. जर किंमत 5 टक्क्यांनी वाढली तर 20 हजार रुपये किंमतीच्या फोनची किंमत 21 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो. पण, यामागचं नेमकं कारण काय आहे, हे देखील समजून घ्यायला हवं. जाणून घ्या…..

 

किंमती वाढण्याचे कारण काय?

 

प्रीमियम स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी पॉवरफुल चिपसेट, मेमरी मॉड्यूल आणि इतर डिव्हाईसची गरज असते. आता वाढत्या उत्पादन खर्चामुळे मोठ्या चिपसेट उत्पादकांना मार्जिनमध्ये घट होत आहे. कंपन्या चिपसेटच्या किंमतीत वाढ करत आहेत. याचा थेट परिणाम मोबाईल फोनच्या किमतींवर होणार आहे.

 

चिपसेट निर्मात्या कंपन्यांनी किंमती वाढवल्या

 

क्वालकॉम आणि मीडियाटेक वेफर या जगातील सर्वात मोठ्या चिपसेट निर्मात्या कंपन्या किंमती वाढवत आहेत. तैवानची चिपसेट कंपनी टीएसएमसी 5 आणि 3 एनएम प्रोसेसरच्या किंमतीत वाढ करत आहे. चिप सेटच्या वाढत्या किमतीचा फटका ग्राहकांना बसू शकतो.

 

किंमत 5 टक्क्यांनी वाढली तर 20 हजार रुपये किंमतीच्या फोनची किंमत 21 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. स्मार्टफोनची जगातील सरासरी किंमत 30 हजार रुपये होऊ शकते.

 

दरवाढीचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतींवर

स्मार्टफोन उद्योगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रीमियम स्मार्टफोनसाठी नेक्स्ट जनरेशन चिप सेट आवश्यक आहे. ते सामान्य चिप सेटपेक्षा 20 टक्के महाग असल्याने त्यांच्या दरवाढीचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतींवर होणार आहे.

 

काउंटरपॉइंट रिसर्चने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, जगभरात स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत 365 डॉलर म्हणजेच 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

 

या कारणांशिवाय स्मार्टफोनमध्ये फोल्डेबल डिस्प्ले, चांगला कॅमेरा सेन्सर आणि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा लागतो.

 

2025 मध्ये स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता

या सर्व कारणांमुळे 2025 मध्ये स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. बजेट सेगमेंटमध्येही कंपन्या तुमच्यासाठी चांगले स्मार्टफोन लाँच करत राहतील, पण बजेट सेगमेंटमध्ये लाँच होणाऱ्या मोबाईल फोनमध्ये अ‍ॅडव्हान्स आणि पॉवरफुल फीचर्सची अपेक्षा करता येणार नाही. हे फीचर्स केवळ मिड-रेंज आणि फ्लॅगशिप फोनसाठी कंपनीपुरते मर्यादित आहेत.

 

फीचर्स देण्यासाठी अधिक पॉवरफुल प्रोसेसरची गरज असते आणि प्रोसेसर जितका पॉवरफुल असेल तितकी किंमत जास्त असते. यामुळेच कंपन्या केवळ पॉवरफुल प्रोसेसरच नव्हे तर चांगले ग्राफिक्सही वापरत आहेत, जेनेरेटिव्ह एआयमुळे फोन महाग होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -