Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन; ट्रायल पेमेंट म्हणून 1 रुपाया पाठवणार

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन; ट्रायल पेमेंट म्हणून 1 रुपाया पाठवणार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी दोनच दिवसात म्हणजे येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण मतदान प्रक्रियेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाणारा भत्ता आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

म्हणजेच या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहे यासाठी सोमवारी म्हणजेच आजपासूनच ट्रायल पेमेंट साठी एक रुपया पाठवण्यात येणार असून पूर्ण रकमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. तुम्ही सुद्धा जर मतदान प्रक्रियेमध्ये काम बजावत असाल तर तुमच्या खात्यामध्ये एक रुपया आल्याचा मेसेज आला आहे की नाही हे तपासून घ्या.

 

बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकांपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकांपासून हा भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथासह मुख्य निवडणूक अधिकारी के सूर्य कृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलय.

 

काय आहे पत्रात ?

या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवडणूक व आहार भत्ता ऑनलाईन स्वरूपात देण्यात यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पीपीएमएस म्हणजेच पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये भरण्यात आलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे आज सोमवारी यातील तपासणी करता प्रत्येकाच्या खात्यावर प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया पाठवण्यात येणार आहे.

 

एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्यांचे काय होणार ?

मतदान पथकांना रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही त्यांचे बँक खाते अद्याप अद्यावत करण्यात येणार आहेत. बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी दिनांक 19 रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बँकेत दिली जाणार आहे. ही रक्कम बँकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.

 

भत्ता वाटपात पारदर्शकता

या आधी मतदान संपल्यानंतर रोखीने भत्ता मिळत होता. मात्र यंदा ऑनलाइन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता येणार आहे मात्र बुधवारी संबंधित बँका ही रक्कम जमा करणे कठीण आहेत. त्यामुळे मुळात या दिवशी बँकेला सुट्टी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यामुळे भत्तावाटप बुधवारीच होईल असं सांगता येत नाही. यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -